मुंबई : प्रतिनिधी ( यास्मीन शेख )
अर्थसंकल्पाच्या चर्चेवर उत्तर देतांना राज्याचे अर्थ मंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या उत्तराची अभंगापासून सुरुवात केली . कोरोना काळात झालेल्या वैद्यकीय सेवा बरोबर अन्य सेवा अधिकाऱ्यांनी काम केले त्यांच्या कौतुकावरही टीका होते ही शोकांतिका आहे. लसीकरणासाठी ग्रामीण भागात राजकीय नेत्यांनी प्रबोधन करण्याची गरज आहे.
राज्यवर कर्ज भार वाढतो आहे हे सत्य आहे, तरी कोविड संकटात कर्ज काढावे लागले. सरकारने प्रयत्न केला की, स्थूल उत्पन्नाच्या 3 टक्केपेक्षा हे कर्ज वाढू नये मात्र कोविड काळात 14 हजार कोटी हे कर्ज रकमेतून खर्च झाले आहे. केंद्र सरकारला ही कोविड काळात कर्ज घ्यावे लागले आहे. योजना या केंद्र आणि राज्य सरकार मिळवून चालवत असतात . त्यात वाटा हा राज्याचाही असतो त्यामुळे भाषणात टीका करताना सदस्यांनी याचा विचार केला पाहिजे. विरोधी पक्ष नेत्यांनी केलेल्या भाषणात पक्षाच्याआधारे निधीचे वाटप केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्या आरोपाला उत्तर देत त्यांनी सांगितले की, सरकार हे कोणाचेही असले तरी सर्व पक्षांचा विचार करून सरकार चालते अन्यथा सरकार चार दिवसही टिकणार नाही. त्यामुळे केवळ टीका करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष नेत्यांनी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्ञानेश्वर महाराज यांच्या 725 समाधी महोत्सवानिमित्त होणारा 100 टक्के खर्च सरकार देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
‘काश्मीर फाईल’ वरून विरोधी पक्षाच्या सभात्याग
कामीर फाईल या चित्रपटावर राज्यसरकारने टॅक्स फ्री करण्याच्या मागणीवर अर्थमंत्र्यांनी सांगितले की , केंद्राने निर्णय घ्यावा म्हणजे सर्व देशभर हा चित्रपट करमुक्त होईल. हा आग्रह का की महाराष्ट्रात कर मुक्त करा ? हे बोलून अजित पवार यांनी जणू सिक्सरच मारल्याची भावना सभागृहात सत्तापक्षातील आमदारांनी शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा करून व्यक्त केली. यावेळी सुधीर मुंगूनटीवार यांनी बोलायचा प्रयत्न केला मात्र तत्कालीन तालिका अध्यक्षांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे नाराजगी व्यक्त करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केला .