मालिकांनची याचिका मालिकांनी फेटाळली

0
31

मुंबई   यास्मिन शेख 

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री  नवाब मलिक यांनी इडी च्या कारवाही विरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावत न्यालायने मलिक यांना चपराक दिली असून मलिक यांच्या अडचणी वाढत असल्याचे  अंदाज लावला जात आहे .

नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली ती अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात ईडीच्या कारवाई विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांची याचिका फेटाळून लावली आहे. नवाब मलिकांच्या या याचिकेवर ईडीच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला आणि पीएमएलएचा कायदा लागू होतो असं ईडीने म्हटलं. त्यानंतर उच्च न्यायालयाने नवाब मलिकांच्या वकिलांचा युक्तीवाद फेटाळून लावला.

तसेच नवाब मलिकांना जामीनासाठी रितसर अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे ही यावेळी कोर्टाने  म्हटले आहे.  मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली. यानंतर नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

ईडीने दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी नवाब मलिक यांनी याचिकेतून केली होती. नवाब मलिक यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात काही तथ्य नाही मात्र त्यांचा संबंध अंडरवर्ल्ड सोबत जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी नवाब मलिकांच्या वकिलांनी केली होती. मात्र, ही याचिका आता उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here