श्री रिद्म हॉस्पिटल आयोजित

0
40

भुसावळ : प्रतिनिधी
येथील श्री रिद्म मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट ,ट्रामा आणि डायलिसिस सेंटर , ब्राम्हण संघा जवळ भुसावळ तर्फे भुसावळ विभागातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह, यावल, सावदा व फैजपूर पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.
प्रारंभी भगवान श्री धनवंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या हस्ते करण्यात येउन शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पो.नि. राहुल गायकवाड, सपोनि भोये, सपोनि संदिप दुंडगहु, शहर वाहतूक पोलिस शाखेचे सपोनि नाईक, शहर व तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी, रुग्णालयाचे डॉ. नितीन पाटील, डॉ. लक्ष्मीकांत नागला, डॉ. महेश पांगळे, डॉ. कुशल पाटील, श्री कल्याणी चेरिटेबल चे गौतम चोरडिया, सुराणा गृपचे समकित सुराणा, चेस्ट फिजिशियन्स डॉ. वंदना गवळी, तुलसी डेंटल क्लिनिकचे डॉ. विजय ढाके, नेत्रम रुग्णालयाचे सुनील मेश्राम उपस्थित होते .
यावेळी मान्यवरांना शाल देउन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. लक्ष्मीकांत नागला यांनी करतांना हॉस्पिटल तर्फे आजपर्यंत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
या शिबिरात श्री रिदयम हॉस्पिटलतर्फे प्राथमिक तपासणी , रक्त चाचण्या ,रक्तदाब , इसिजि ,रक्तातील शुगर सह विविधव्याधीवर उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. वंदना गवळी यांनी फफुसाचे आजारा संबंधी तपासणी करुन मार्गदर्शन केले. डॉ .विजय ढाके यांनी दंत तपासणी केली तर नेत्रम रुग्णालयाचे सुनील मेश्राम यांनी नेत्र तपासणी केली. तसेच आवश्‍यक असलेल्याच्या विविध रक्त चाचणी
करण्यात आल्या . या प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी वाघचौरे यांनी या उपक्रमाबद्दल कौतुक करुन पोलिसांनी नियमित आरोग्य तपासणी कराव्यात असा सल्लाही दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here