बहुभाषिक ब्राह्मण संघ अध्यक्षपदी अजित नांदेडकर यांची बिनविरोध निवड

0
28

जळगाव : प्रतिनिधी
बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या अध्यक्षपदी अजितदादा नांदेडकर यांची सर्वानुमते निवड झाली. रविवारी सत्यवल्लभ कार्यालयात बहुभाषिक ब्राह्मण संघाची वार्षिक सभा झाली.
माजी अध्यक्ष अशोक वाघ यांनी सूत्रे नवीन अध्यक्षाकंडे दिली. यावेळी श्रीकांत खटोड यांनी आगामी परशुराम जयंती उत्सव भव्य साजरा करण्याविषयी माहिती दिली.दाधीच समाजाने महाप्रसादाची जबाबदारी स्वीकारली. संघाचे संस्थापक लेखराज उपाध्याय, सुरेंद्रनाथ मिश्रा, महिला संघ अध्यक्षा कमल पाठक, संजय कुलकर्णी, सुरेश जोशी, सूरज दायमा, सतीश दायमा, ऋषिकेश शर्मा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here