शनिपेठेत दोन गटात दगडफेक

0
35
  1. जळगाव : प्रतिनिधी
    शहरातील शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीत असलेले गवळीवाडा व काट्या फैल या भागात दोन गटांमध्ये रविवारी रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास दगडफेक झाल्याचे समजतात शनिपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी दाखल होताच. पुढील अनर्थ टळला.
    याबाबत सविस्तर वृत्त असे की, शनिपेठ पोलिस स्थानक हद्दीत असलेला गवळीवाडा व काट्या फैल या परिसरात रात्री नऊ वाजेनंतर काही तरुणांमध्ये वाद झाल्याने दोन गटात दगडफेक झाली. या घटनेनंतर तत्काळ घटनास्थळी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या दगडफेकीत चार चाकी गाडीचे नुकसान झाल्याचे समजते.  पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या आदेशाने तत्काळ, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, यांच्यासह राखीव पोलिसबळ घटनास्थळी दाखल झाले होते. भिलपुरा पोलिस चौकी ते ममुराबाद रोड या रस्त्याचे काम सुरु असून दोन्ही बाजुने गिट्टी खडी आणि दगडं पडलेली आहेत. एका बाजुला गवळीवाडा-दुस-या बाजुला काट्याफैल अशा स्वरुपात जमावाने एकमेकांवर रस्त्यांची गिट्टी आणि दगडांचा मारा केला याबाबत शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे घटनास्थळी शातमय वातावरण आहे. पुढील तपास व माहिती पोलीस घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here