सोयगाव तालुक्यात वाढली उन्हाची दाहकता

0
22

सोयगाव : प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यात उन्हाची दाहकता वाढू लागल्याने तसेच पाझर तलाव, कोरडे पडत असल्याने वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी सोयगाव वनविभागाकडून सोयगाव वनपरिक्षेत्रामधील पाणवट्यामध्ये पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे, सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांच्या वन्यप्राण्यांचा प्रश्न गांभीर्याने घेऊन पाझर तलाव कोरडे पडलेल्या वनक्षेत्रामध्ये पाणवटे भरण्यासाठी तत्परता दाखवून आपल्या परिक्षेत्रात येणाऱ्या बहुतांश ठिकाणी पाणवटेमध्ये पाणी भरून वन्यप्राण्यांच्या तहानेचा प्रश्न सोडविला आहे, जरंडी शिवार, बहुलखेडा शिवार याठिकाणी पाणवटे मध्ये पाणी सोडण्यात आले असून ज्या ठिकाणी पाणवटे नाहीत अशा ठिकाणी लवकरच पाणवटे तयार करण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांनी माहिती दिली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ व सहायक वनरक्षक सिल्लोड पुष्पा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गणेश सपकाळ, वनरक्षक एस हिरेकर, नितेश मुलतानी, नागरगोजे, वनसेवक गोविंदा गांगुर्डे, संतोष राठोड, छगन झालटे, गणेश चौधरी, अंबु राठोड, हे याकामी परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here