नैसर्गिक वायू होणार स्वस्त ; सोन्यावरील स्टॅम्प ड्युटी रद्द

0
27

मुंबई
राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. विकासाची पंचसुत्री राबविणार असून कृषी क्षेत्र आपल्या विकासाचा पाया असल्याचेही त्यांनी सांगितले. पेट्रोल डिझेलवरील कर कमी न केल्याने सामान्यांना दिलासा मिळाला नाही. परंतू घरगूती वायू वापराला प्रोत्साहन देणार असल्याचे ते म्हणाले. नैसर्गिक वायुवरील मुल्यवर्धित कर १३.५ टक्क्यांवरून ३ टक्के इतका कमी केला जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात सीएनजीचे दर कमी होणार आहे. हा एकप्रकारे जनतेसाठी दिलासा ठरणार आहे. सोबतच सोन्यावरील स्टॅम्प ड्युटी रद्द केल्याची माहिती त्यांनी दिली.
अर्थसंकल्पात विकासाची पंचसुत्री राबविणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगीतले.
राज्य कर कायद्याअंतर्गत दहा हजारांची थकबाकी रक्कम माफ करणार असल्याचे सांगत घरगूती वायू वापराला देणार प्रोत्साहन असून, सीएनजीवरील मुल्यवर्धित कर १३.५ टक्क्यांवरून ३ टक्के करण्यात आले. मुद्रांक शुल्कासाठी दंड सवलत अभय योजना त्यातून १ हजार ५०० कोटींची तुट जलवाहतूक चालना देणार , सारथीला २५० कोटी ,पाणी विभागाला ३ हजार कोटी राज्यात १८ अती जलद न्यायालय, सार्वजनिक बांधकाम विभागाला १५ हजार ७०० कोटी, एसटीला मिळणार ३ हजार पर्यावरण पुरक बसेस, रत्नागिरी विमानतळासाठी १०० कोटी, पंढरपुर मंदीर विकासासाठी २५ कोटी ,अष्टविनायक मंदीर विकासासाठी ५० कोटी , नक्षलग्रस्त भागात कमांडोना भत्ता ४ हजारांवरून मराठीच्या विकासासाठी, मुंबईत शंभर कोटी खर्चून भवन उभारणार,मराठावाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवाला ७५ कोटी रुपये , शंकरराव चव्हाण सुवर्ण पत्रकार निधीत ३५ कोटींवरून ५० कोटी एवढी वाढ , प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव, ऐरोलीत मराठी संशोधन केंद्र , शालेय शिक्षण विभागासाठी २३५४ कोटींचा निधी, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी १५ हजार कोटींचा भरघोस निधी , एसटी कर्मचाऱ्यांच्या वेनासाठी ४ हजार कोटी , ३ लाखांपेक्षा जास्त रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार , पंडीता रमाबाई यांच्या नावाने नविन योजना, अजिंठा वेरूळ येथे सामुहिक सुविधा केंद्र , नाशिक- दिंडोरी येथे आदीवासी औद्योगिक विकास केंद्राची होणार स्थापना , पुण्यात ३०० एकरमध्ये मेडीसीटी, गडचिरोलीत नविन विमानतळ , नांदेड -हैद्राबाद बुलेट ट्रेनसाठी केंद्राकडे पाठपूरावा करणार, लता मंगेशकर संगीत विद्यापीठासाठी १०० कोटींचा निधी , ईलेक्ट्रीक वाहनांसाठी ५ हजार ठिकाणी चार्जिंग स्टेशन ,  लातूरमध्ये सौरऊर्जा प्रकल्प, समद्धी महामार्गाचा विस्तार होणार, भुसंपादनासाठी निधी , कौशल्य विभागाला ६०० कोटींचा निधी, वैद्यकीय शिक्षणासाठी २ हजार कोटी रुपये , सर्व जिल्ह्यात महिला रूग्णालय उभारणार , मनोरुग्णासाठी जालन्यात रुग्णालय  , तृतीय पंथीयांना ओळखपत्रे देणार , ट्रामा केअरसाठी १०० कोटींचा निधी , विद्यापीठात समाजसुधारकांच्या नावे अध्यासन केंद्र , महाज्योतीला १०० कोटींचा निधी ,आदीवासी विकास विभागाला ११ हजार १९९ कोटींचा निधी , मृदा संवर्धनासाठी ४ हजार ७०० कोटी, १ लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दीष्ट , कर्करोग निदानासाठी वैद्यकीय शिक्षणासाठी २ कोटींचा निधी , स्टार्टअपसाठी १०० कोटी , २०२२-२०२३ मध्ये ५ लाख घरकुलांचे उद्दीष्ट , नॅनो, जैव तंत्रज्ञाना, ड्रोन तंत्रज्ञाना, ड्रोन तंत्रज्ञानासाठी प्रत्‍येक विभागात एक इनोव्‍हेशन हब उभारणार , मुंबईतील पशुवैद्यकीय रुग्णालयाला 10 कोटी रुपयांचा निधी, सदृढ पशुधनासाठी 3 फिरत्या पशुशाळा उभारणार,  8 कोटी रुपये खर्च करुन 8 मोबाईल कर्करोग निदान वाहने सुरु करणार, पायाभुत सुविधांसाठी भरीव तरतूद , छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार सुरु करणार ,कर्मचाऱ्यांची २७५ कोटी ४० लाखांची देणी देणार, ४१ हजार कोटींचे कर्ज वाटप ,वसमत येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र १०० कोटींचा निधी मिळणार ,येत्या तीन वर्षांत मराठवाड्याला ३ हजार कोटी रुपये अन्न प्रक्रीया येत्या तीन वर्षांत राबविणार, कृषी निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र पहिले, नियमीत कर्जफेड शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदानात वाढ, या आर्थिक वर्षात कृषी सिंचन योजनेचा विस्तार करणार २० लाख शेतकऱ्यांना लाभ होणार, शेतकऱ्यांसाठी ६० हजार वीज कनेक्शन जोडणार, जलसंपदा विभागासाठी १३ हजार कोटींचा निधी , आरोग्य सेवांवर तीन वर्षांत ११ हजार कोटी रुपयांचा खर्च, हवेलीमध्‍ये छत्रपती संभाजी महाराज यांच स्‍मारक उभारणार, 250 कोटी रुपये खर्च करणार , विदर्भ, मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीन शेतकर्यांना उत्‍पादकात वाढविण्‍याठी निधी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here