‘मिशन महाराष्ट्र’साठी महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांना ऑफर?

0
17

मुंबई : प्रतिनिधी
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत भाजपने चार राज्यांत दणदणीत विजय मिळविला. भाजपच्या या यशानंतर आता महाराष्ट्रात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्या दृष्टीने भाजपने हालचालीही सुरू केल्या. महाराष्ट्रात एकूण 288 आमदार आहेत. त्यापैकी 105 आमदार हे भाजपचे आहेत. तर इतर 17 आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. सत्तेत येण्यासाठी भाजपला आणखी काही आमदारांची आवश्‍यकता आहे. याकरिता भाजपचे युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता स्थापन करण्याच्या संदर्भात भाजपकडून जुना मित्र असलेल्या शिवसेनेला ऑफर दिली जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी नकार दिला तर भाजप शिवसेनेचे काही आमदार फोडून सत्ता स्थापण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे. इतकेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतही आघाडी करण्यासाठी भाजप पुढाकार घेणार असल्याची माहिती आहे. गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली होती. त्यांनी केलेल्या कामगिरीनंतर भाजपने गोव्यात एकहाती सत्ता स्थापन करण्यात यश मिळविले आहे. या यशानंतर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजप पूर्ण बहुमताने सत्ता स्थापन करेल, याकरिता आम्ही प्रयत्नशील असल्याचे फडणवीस म्हणाले. याच दरम्यान जर महाविकास आघाडी सरकार पडलं तर आम्ही आमचं सरकार बनवू. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी काही तारखा घोषित करून लवकरच बॉम्ब पडेल, असे विधान केले होते. त्यात 10 , 11 मार्च या तारखा होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना आवरले पाहिजे. कारण राऊत लोकसत्तेत जातील, उद्या तरुण भारतमध्ये येतील. पण उद्धव ठाकरे आणि आदित्य यांना भविष्य आहे. त्यामुळे ठाकरेंनी राऊतांबाबत नक्कीच विचार करायला हवा, असा सल्ला पाटील यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here