आझाद हिंद एक्सप्रेसचे इंजिन ट्रॅकवरुन उतरले

0
29

नागपूर : वृत्तसंस्था
येथील डायमंड क्रॉसिंग वरून यार्डकडे जाताना दोन चाक ट्रॅकवरून उतरल्याची घटना घडली. हावडा पुणे आझाद हिंद एक्सप्रेस गाडीचे इंजिन नागपूर मेन स्थानकाजवळ ट्रक वरून उतरले. हावडावरून पुण्याला जात असताना गाडी नागपूरच्या डायमंड क्रॉसिंग वरून यार्डकडे जाताना दोन चाक ट्रॅकवरून उतरल्याची घटना घडली. गाडीची स्पीड कमी आणि लोको पायलाटच्या समयसूचकतेमुळे घटना टळली. रेल्वेच्या डब्यांना काहीही झालं नाही. सगळे डब्बे ट्रॅक वरच आहेत. गाडीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरु आहेत. या अपघातामुळे पूर्वेकडून येणाऱ्या रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here