जळगावःप्रतिनिधी
एका 16 वषर्भय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. नराधमाने पिडीत मुलीचे फोटो सोशल मिडीयवर व्हायरल करण्याचे तसेच वडीलांना ठार मारण्याची देखिल धमकी दिल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. या धक्कादायक प्रकरणी औद्योगीक वसाहत पोलीस ठाण्यात नराधमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक असे की, शहरातील रहिवासी 16 वर्षीय मुलगी आपल्या कुटूंबासोबत वास्तव्यास आहे. डिसेंबर 2020 मध्ये शहरातील एका मार्केट मध्ये पिडीत काप्ाडे खरेदी करण्यासाठी गेली होती. तेथे दिपक सोनवणे(पूर्ण नाव माहित नाही) या मुलाशी तीची ओळख झाली. यानंतर मुलीला काही न काही कारण सांगत शहरातील फुले मार्केेट मध्ये बोलावून तिच्यावर अतयाचार करीत असलय्ाचा प्रकार घडला. या घटनेची वाच्यता घरी सांगीतल्यास आई वडीलांना मारून टाकू अशी धमकी नराधमाने पिडीतास दिली. तसेच अल्पवयीन मुलीच्या काकाच्या घरात देखिल तरूणाने पिडीतेवर अत्याचार केला. वेळोवेळी भेटली नाही तर तुझे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करेल अशी धमकी देखिल पिडीतेस देण्यात आली होती. पिडीत मुलगी या धमकीमुळे तक्रार करण्यास धजावत होती.मात्र वारंवार होत असल्ोल्या छळामुळे अखेर पिडीतेने एमआयडीसी पोलीस ठाणे गाळून तिच्यावर झालेली आपबीती पोलीसांना सांगीतली. पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून संशयीत नराधम दीपक सोनवणे याच्या विरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील तपास पो.नि.प्रमोद कठोरे हे करीत आहेत.