मलकापूर:सतीश ढांगे
10/3/22हरियाणा येथे होणार असलेल्या ६८ व्या राष्ट्रीय सिनिअर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सह्भागी होण्यासाठी विदर्भ महिला कबड्डी संघ चारकी दादरी हरियाणा करीता गंगानगर एकस्प्रेस रेल्वेने रवाना झाला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी विदर्भ महिला कबड्डी संघातील सदस्यांचे त्यांच्या प्रशिक्षकासहित मलकापूर येथील रेल्वे स्थानकावर पद्मश्री डॉ.व्ही.बी.कोलते इंजिनीरिंग कॉलेजच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. व पुढील यश मिळविण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच या प्रसंगी त्यांना भोजनाचे पार्सल व पिण्याचे पाणी देण्यात आले. तसेच या ठिकाणी संघाचे प्रशिक्षक प्रदीप सेलूकर सर, आणि विदर्भ कबड्डी असोसिएशन चे सहसचिव सतीश डफले सर यांचाही पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे आपल्या राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या जिल्ह्यातील तीन खेळाडू संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. ही बाब निश्चितच गौरवास्पद आहे असे वक्तव्य यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल खर्चे यांनी केले.
या सत्कार कार्यक्रमाच्या वेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, प्रा.तेजल खर्चे, प्रा. जयप्रकाश सोनोने, प्रा.डॉ.अवचिता नाले, स्पोर्ट डायरेक्टर कैलास कोळी यांच्यासहित विद्यार्थिनी सुध्दा स्वयंफुर्तीने हजर होते. अशा प्रकारच्या आपणाकडून मिळालेल्या सद्भावना निश्चितच आमच्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मनोगत संघातील महिला खेळाडूंनी व्यक्त केले.आम्ही खात्रीने आपल्या विदर्भाचे नांव देशपातळीवर मानाने उंचावून यश संपादन करूच अशी इच्छा प्रगट केली.या वेळी मलकापूर रेल्वे स्टेशनचे प्रबंधक राजपूत यांचे अनमोल सहकार्य लाभल्याने त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी बुलढाणा जिल्हा कबड्डी असो.चे पदाधिकारी महावीर थानवी,सहसचिव जिल्हा कार्यकारिणी,गजानन राउत सदस्य,अशोक मोहता ज्येष्ठ खेळाडू यांनी ही महिला खेळाडूना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.आजपर्यंत मलकापूर शहरामधून अनेक नामांकित राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी क्रिडा क्षेत्राला लाभले.खेळाडूंना प्रोत्साहित करण्याची परंपरा पद्मश्री डॉ.व्ही.भि कोलते इंजिनीरिंग महाविद्यालयाने जोपासली अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ कबड्डी खेळाडू अशोक मोहता यांनी दिली.