विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
सोयगांव नगर पंचायत महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्वछता व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४३ महिलांना कोविड योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सोयगांव शहरात सफाई कामगार म्हणून कार्य करणाऱ्या १६ महिला,१० अंगणवाडी सेविका,१० मदतनीस ६ आशा स्वयंसेविका व एक आरोग्य सेविका अशा ४३ महिलांना कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नगर पंचायत महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने कोविड योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. नगराध्यक्षा आशाबी तडवी, उपनगराध्यक्षा सुरेखाताई काळे, महिला व बाल कल्याण सभापती कुसुम राजू दुतोंडे, उपसभापती शाहिस्ताबी रऊफ शेख,सदस्य किशोर संध्या मापारी, ममता विष्णू इंगळे, आशियांना कदीर शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.आरोग्य सेविका कल्पना डांगरे,अंगणवाडी सेविका सुलोचना मानकर यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राजू दुतोंडे यांनी केले. प्रास्ताविक राजेंद्र जंजाळ यांनी केले.यावेळी गटनेते तथा बांधकाम सभापती अक्षय काळे,नगरसेवक दिपक पगारे,हर्षल काळे, लतीफ शहा,संतोष बोडखे, भगवान जोहरे, संदीप सुरडकर,गजानन कुडके,नगरसेविका वर्षा घनगांव, सुलताना रऊफ देशमुख यांच्यासह रंजना काळे,रेखा देसाई, रउफ शेख,किशोर मापारी, अमोल मापारी,राजू घनगांव,विष्णू इंगळे, कदीर शहा, रउफ देशमुख,विवेक महाजन आदी उपस्थित होते. राजेंद्र जंजाळ, राजेश मानकर, दिपक राऊत, सारंग बागले, हिवाळे, ऋषिकेश बागले,दिपक पगारे आदी कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.