जळगाव : प्रतिनिधी
येथील लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे सरदार वल्लभाई पटेल चषक पर्व तिसरे अंतर्गत ‘लेवा पाटीदार प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथमच महिलांच्या क्रिकेट सामना झाला. सामन्यात सुचंद्रजी रायझिंग स्टार संघाने एक हाती विजय मिळवला. विजयी संघाला मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
संघमालक पल्लवी चिरमाडे यांच्या चिरमाडे पिंक दिवास आणि संघमालक पूनम कोल्हे यांच्या सुचंद्रजी रायझिंग स्टार यांच्यामध्ये सामना झाला. हा सामना अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला लेवा पाटीदार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये तीन वर्षात प्रथमच महिलांचा सामना खेळला गेला.
सामन्यात संघमालक पूनम कोल्हे यांच्या विजयी सुचंद्रजी रायझिंग स्टार संघाला मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. यावेळी मंचावर महापौर जयश्री महाजन, माजी महापौर तथा सभागृहनेता ललित कोल्हे, सरकारी वकील ऍडव्होकेट केतन ढाके, उद्योजक सुनील सरोदे, नगरसेविका सिंधुताई कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते ललित चौधरी यांच्यासह संघमालक उपस्थित होते.