जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील निमखेडी शिवारात असलेले शिवधाम मंदिरात काल महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दरवर्षाप्रमाणे यंदाही या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महत्व प्राप्त झालेले आहे. याठिकाणी येणाऱ्या भक्तांना आर.के.गृपतर्फे साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली. यावेळी गृपचे राज कोळी, गौरव कोळी, शाम पवार, हरिश रावतकर, सुनिल वाघ, रुपेश साळुंके, कुणाल खैरनार, लवेश पाटील, राहुल पाटील आदींचे सहकार्य लाभले.