चाळीसगाव – प्रतिनिधी मुराद पटेल
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी औरंगाबाद येथे आपली गरळ ओकली.तेथे रामदास हे शिवरायांचे गुरू होते व रामदास नसते तर शिवरायांना कोणीच ओळखले नसते असे संतापजनक विधान केल्याने शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या संतापजनक विधानाच्या निषेधार्थ शहरातील तहसील कार्यालय समोर दि १ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता शिवप्रेमीं संघटनानी निषेध आंदोलन करून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी सपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी. अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू दिले जाणार नाही. असा इशारा शिवप्रेमी संघटनाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना चाळीसगाव तहसीलदार द्वारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे स्वयंभू व्यक्तिमत्व होते.त्यांच्या स्वराज्याची संकल्पना ही राष्ट्रमाता जिजाऊ व राजे शहाजी यांनी मांडली.शिवरायांनी ती संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात आणली.त्यासाठी त्यांना त्यांचे आई वडील दोघांचेही मार्गदर्शन लाभले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू ह्या राष्ट्रमाता जिजाऊ या त्यांच्या आईच होत्या.तसेच त्यांच्यावर संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या विचारांचाही प्रभाव होता.त्या अर्थाने तुकाराम महाराज सुद्धा त्यांचे गुरू आहेत.यात रामदास स्वामी कुठेच नाहीत.
मात्र तरीही महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी औरंगाबाद येथे आपली गरळ ओकली.तिथे रामदास हे शिवरायांचे गुरू होते व रामदास नसते तर शिवरायांना कोणीच ओळखले नसते असे संतापजनक विधान ते करतात.वास्तविक छत्रपती शिवराय व रामदास यांची आयुष्यात कधीही भेट झालेली नाही.असे ऐतिहासिक पुरावे आहेत.असे असतानाही राज्यपाल मुद्दामहून महाराजांचा अवमान करत आहेत.राज्यपालांनी त्यांच्या या वक्तव्याची सपूर्ण महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी.अन्यथा शिवप्रेमी त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही.राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केलेल्या अवमानकारक व्यक्तव्याच्या विरोधात शिवप्रेमीं संघटनानी निषेध आंदोलन करत राज्याचे मुख्यमंत्री यांना दि १ मार्च रोजी सकाळी ११ वाजता चाळीसगाव तहसीलदार द्वारा निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.आंदोलनात रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, वीर भगतसिंग परिषदेचे पंकज रणदिवे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुधीर पाटील, मराठा महासंघाचे खुशाल बिडे,जळगाव जिल्हा दूध संघ संचालक प्रमोद पाटील,सभापती अजय पाटील,मा .नगरसेवक दिपक पाटील,राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे भैय्यासाहेब पाटील,शेकापचे गोकुळ पाटील,संस्थापिका – कुळवाडीभूषण समाज विकास संस्था जयश्री रणदिवे,योगेश पाटील,पंकज पाटील,आकाश पोळ,राकेश राखुंडे,सचिन पवार,प्रदीप चिकणे,प्रदीप पाटील,रवींद्र देशमुख,सोनु देशमुख,विलास मराठे, स्वप्निल गायकवाड, संजय कापसे, दिलीप पवार, भरत नवले , प्रदीप मराठे, प्रशांत अजबे, मुकुंद पवार,भैय्यासाहेब महाजन अदि सहभागी झाले होते.