अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील सिंधी कॉलनी भागातील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील १० हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण ५५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर असे कि, किशोर लालचंद डावराणी रा. सिंधी कॉलनी अमळनेर हे कामाच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी रोजी घर बंद करून बाहेर गावी गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडीकोयंडा तोडून घरातील १० हजार रुपयांची रोकड आणि ४५ हजार रुपये किमतीचे कानातील दागिने असा एकूण ५५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी किशोर डावराणी यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनिल पाटील करीत आहे.