रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील चिनावल येथील शिवारातून होणार्या चोर्यांबद्दल शेतकर्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर आता पोलिसांनी कारवाईस प्रारंभ केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, चिनावलसह परिसरातील गावांच्या शिवारातून मोठ्या प्रमाणात चोरी होत असतांनाही पोलीस प्रशासन काही कारवाई करत नसल्याने शेतकर्यांचा दोन दिवसांपूर्वीच उद्रेक झाला होता. यामुळे संतापलेल्या शेतकर्यांनी रविवारी सावदा येथे दोन तास रास्ता रोको आंदोलनही केले. चोरट्यांना व शेतमाल आणि साहित्याची नासधूस करणार्यांना तत्काळ अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले होते.
यानंतर कालपासून चोरी करणार्यांची खातरजमा करण्यात येत असून त्यांच्यावर कारवाईची तयारी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. 35 पेक्षा जास्त चोरटे पोलिसांच्या रडारवर असून त्यापैकी दोन जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सुध्दा समोर आली आहे