विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यात १०५ पोलिओ लसीकरण केंद्रांवर तेरा हजार ७४३ बालकांपैकी तब्बल १२ हजार ९७४ बालकांना पोलिओची मात्रा देण्यात आली आहे सोयगाव तालुक्यात ९४ टक्के पोलिओ लसीकरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
तीन प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सोयगाव तालुक्यात पोलिओ लसीकरणाची टक्केवारी वाढलेली असून यामुळे १२ हजार ९७४ बालके पोलिओ पासून सुरक्षित झाली आहे.सोयगाव तालुक्यात जरंडी-९८,बनोटी-४५ आणि सावळदबारा-२२ याप्रमाणे पोलिओ लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून त्यावर २६७ कर्मचाऱ्यांनी पोलिओ लसीकरण मात्रा बालकांना दिल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
—–आजपासून घरोघरी मोहीम—-
रविवारी पोलिओ लसीकरण मोहीम संपल्यानंतर सोमवार पासून तीन दिवस घरोघरी पोलिओ लसीकरण हाती घेण्यात आली आहे.त्यामुळे सोयगाव तालुक्यातून पोलिओ पासून बालकांना सुरक्षित करण्याचे काम आरोग्य विभागाने घेतले आहे.