जळगाव : प्रतिनिधी
शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या महामार्गावरील बुलेट शोरूम समोर भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना रात्री घडलीय. सागर विजय राणे (वय-३०) रा. हिंगोणा ता. यावल ह.मु. जळगाव मृत तरुणाचे नाव असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, यावल तालुक्यातील हिंगोणा येथील सागर विजय राणे हा जळगाव शहरात नोकरीच्या निमित्ताने वास्तव्याला आहे. सागर हा २६ रोजी दुचाकीने हिंगोणा येथे राहत्या घरी गेला होता. घरून परतत असताना रविवारी रात्री जळगाव-भुसावळ मार्गावरील बुलेट शोरूमच्या समोरून त्याच्या दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत सागर राणे हा तरुण जागीच ठार झाला आहे. यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह जिल्ला शासकीय शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला. दरम्यान मयताच्या पश्चात पत्नी पल्लवी, आईचा चारूलता, वडील विजय वासुदेव राणे असा परिवार आहे. दरम्यान एकुलता एक मुलगा गेल्याने राणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, याप्रकरणी शरद रमेश जावळे वय (वय-४६) रा. रोझोदा ता. रावेर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे