सोनी नगरातील स्वयंभू महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त

0
29

जळगाव : प्रतिनिधी  
शहरातील उपनगर असलेल्या पिंप्राळा परिसरातील सावखेडा रोडजवळील सोनी नगर येथील  स्वयंभू महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त उद्या दि.1 मार्च  रोजी  विविध धार्मीक कार्यक्रम आयोजीत करण्यातआले आहे.
महाशिवरात्री निमित्त उद्या सकाळी ६ ते ९ वाजेच्या दरम्यान पुजारी चेतन कपोले महाराज यांच्या हस्ते ” रुद्रअभिषेक व हवन पूजा ” सोहळा पार पाडण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता  महादेवाची महाआरती परिसरातील भाविकांच्या हस्ते होणार आहे.
दुपारी 3 वाजता शहरातील सुप्रसिद्ध श्री भक्ती महिला मंडळाच्या प्रियंका विशाल त्रिपाठी ” समुहसह भजन ” सादर करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता महादेवाची महाआरती होणार आहे. सायंकाळी 7 वाजता ह.भ.प. देवदत्त मोरदे महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला सोनी नगर परिसरातील शिवभक्तांनी उपस्थिती रहावे असे आवाहन शिवभक्तांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here