चोपडा : प्रतिनिधी
शहरातून जाणाऱ्या धरणगाव – चोपडा रस्त्यावर आज सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास रस्त्याने जात असलेले आयसर वाहन त्यामागून येणाऱ्या दुचाकीचा अपघात होवून या अपघातात जागीच एकाच कुटूंबातील आई व मुलगी मयत होवून वडिल व मुलगा जखमी असल्याचे वृत्त आहे.
याबाबत सविस्तर असे की, चोपडा शहरातून धरणगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आयसर धरणगावच्या दिशेने जात असतांना आयसरच्या मागे दुचाकी होती, यावेळेस दुचाकीस्वार सरळ जात असतांना आयसरने रस्त्याच्या बाजूला वळत असतांना मागून येणारी दुचाकी आयसरच्या खाली कोसळली. या अपघातात उज्वला जगदीश मोतीराळे (वय 37) व नेहा जगदीश मोतीराळे (वय 12) या आई व मुलीचा जागीच मृत्यू झाला असून तर दुचाकी चालक चोपडा तालुक्यातील मामलदे येथील जगदीश भिमराव मोतीराळे(वय 40) व आवेश जगदीश मोतीराळे(वय 10) हे जखमी झाले आहे. घटनास्थळी तत्काळ चोपडा शहर पोलिस स्थानकाचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेवून घटनास्थळाचा पंचनामा केला. जखमींना रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजते. आयसर चालक याठिकाणाहून फरार झाल्याचे समजते.