विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
वरठाण प्रतिनिधी. घरी येत असतांना गुराना पाण्यातुन काढण्यासाठी गेलेला अठ्ठाविस वर्षीय तरुणांचा धरणात बुडुन मृत्यू झाल्याची घटना म्हशिकोठा ता सोयगाव येथे चार वाजेच्या सुमारास घडली….
मृत तरुणांचे नाव कीरण नाना गोलाईत (रा.म्हशींकोठा, ता.सोयगाव) असे आहे
म्हशीकोठा येथील कीरण गोलाईत हा गुरडोरे चारण्यासाठी खडकदेवळा( ता पाचोरा) धरणाजवळ गेलेला होता….………..०पाच वाजेच्या सुमारास जनावरे पाणी पिण्यासाठी धरणाजवळ आले पाणी पितांना काही जनावरे खोल पाण्यात जात असल्याने किरण जनावरे बाहेर काढण्याचा नादात पाण्यात बुडाला असल्याचे माहिती हाती आली आहे
या घटनेबाबत पोलीस पाटील यांनी बनोटी पोलीस चौकीस माहीती दीली असुन कीरण याची उत्तरीय तपासणी पाचोरा येथील सामान्य रुग्णालयात करण्यात आली