जिल्ह्याच्या विकासासाठी गावं हे विकासाच केंद्रबिंदू बनले पाहिजे – ना. गुलाबराव पाटील

0
26

धरणगाव : प्रतिनिधी
ज्या गावामध्ये विकासाची दिशा एकसंघपणे ठरते ते गाव समृद्ध होण्यास वेळ लगत नाही. समृद्ध गाव हाच उद्देश नजरेसमोर ठेवून गाव विकासासाठी प्रयत्नशील आहे. पालकमंत्री म्हणून किंवा माझ्या मुलांनी गावात भानगडी लावण्याचे पाप कधीही केले नाही . राजकीय पटलावर स्पर्धा होणारच पण तिचा परिणाम गावाच्या विकासावर कधीही होता कामा नये. घाणेरड्या राजकारणाचा शिरकाव गावात होऊ देऊ नका. कार्यकर्त्यांनी वडाच्या झाडाच्या पारंबी प्रमाणे नम्र राहून विकासासाठी जनतेच्या आशीर्वादाने व सहकार्याने विकासाची चालना मिळत असते. लोकार्पण झालेल्या व्यायाम शाळेत तरुणांसाठी व्यायामशाळा साहित्य उपलब्ध केले जाईल अशी ग्वाही दिली. धार – चोरगाव रस्त्यावरील ३ कोटींच्या निधीतून ३ लहान पुलांचे काम लवकरच सुरु होणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. ते धरणगाव तालुक्यातील शेरी येथे विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. तत्पूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे गावात आगमन होताच अबालवृद्धानी सहभागी होऊन ढोल ताश्यांच्या गजरात ग्रामपंचायत, विका सोसायटी व शिवसेना व युवासेना मार्फत त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, तालुका प्रमुख गजानन पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, पं. स. सभापती प्रेमराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, रविंद्र चव्हाण सर, अनिल पाटील, सरपंच सुवर्णा कैलास बोरसे, उपसरपंच भिकन कोळी, ग्रा. पं. सदस्य शांताराम कुमावत, अमोल पवार, देवीदास चौधरी,विमालबाई चौधरी, शांताबाई नाईक, अश्विनी बोरसे, ग्रामसेविका वैशाली पाटील, पोलीस पाटील छाया पवार, पांडुरंग केळकर , युवसेनेचे विशाल पाटील, संदीप बोरसे , दामूअण्णा पाटील, सुभाष पाटील, गोकुळ लंके, किशोर पाटील, ठेकेदार अमोल कासट पाळधी आव्हाणी, धार, कवठळ, रेल, लाडली , दोनगाव,निमखेडी व पथराडचे सरपंचासह परिसरातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंचपती कैलास बोरसे यांनी केले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गावात ३ कोटीचे काम दिल्याबद्दल जाहीर ऋण व्यक्त करून कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन उपशिक्षक राहुल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन आत्मा कमिटीचे तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी केले.
या प्रसंगी धरणगाव तालुक्याचे आत्मा कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील , विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील सर, सरपंच संघटनेचे सचिन पवार, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील , गोपाल चौधरी , तालुका प्रमुख गजानन पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी मनोगतात केंद्राचे भाजपा सरकार वर सडकून टिका केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघासह जिल्ह्यात केलेली विकास काम हे उल्लेखनिय असून येणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जनतेने काम करणार्‍याच्या सदैव पाठीशी राहावे असे आवाहन केले.
शेरी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सवाद्य मिरवणूक काढून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ना. पाटील यांच्या हस्ते ३ कोटी निधीच्या विविध विकास कामांचे विधिवत पूजा करून भूमिपूजन करण्यात येऊन व्यायामशाळा इमारतीचे ( ९ लक्ष, ) लोकार्पण करण्यात आले. जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविणे – १ कोटी १० लक्ष, शेरी ते फाटा रस्ता डांबरीकरण करणे लक्ष योजने अंतर्गत श्रीकृष्ण मंदिर परिसरात भक्तनिवास बांधकाम करणे- ४० लक्ष , जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संरक्षण भिंत बांधणे – ३१ लक्ष , स्थानिक आमदार निधीतून पेव्हिंग ब्लॉक व रस्ता कॉंक्रिटीकरण करणे – ६ लक्ष, अनुसूचित जाती जमाती वस्तीत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे – ५ लक्ष, ग्रा. प. च्या १५ वित्त आयोग व शासनाच्या मूलभूत योजनेंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसविणे- ५ लक्ष , स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत शौचालय बांधकाम करणे – ३ लक्ष, स्मशानभूमी सुशोभीकरण करणे – ३ लक्ष, समाज मंदिर दुरुस्ती करणे – २ लक्ष अशा एकूण ३ कोटी ३५ लक्ष कामांचे पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते गाव विकासाच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी धरणगाव तालुक्याच्या आत्मा कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुधाकर पाटील यांचा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here