जळगाव : प्रतिनीधी
प्रखर राष्ट्रभक्त,स्वातंत्र्य विर समाजसुधारक, लेखक, कवी, आयुष्यातील प्रत्येक क्षण आणि शरीराचा प्रत्येक कण मातृभूमीच्या स्वातंत्र्य आणि सेवेसाठी अर्पित करणारे थोर स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त भाजपा तर्फे अभिवादन करण्यात आले.
आज दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता स्वातंत्र्य चौकातील गांधी उद्यानातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला (पुतळ्याला) माल्यार्पण व पूजन भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आ. राजुमामा भोळे, दिल्ली येथील भाजपा कार्यालय चे प्रसिध्द आर्किटेक्ट अरविंद नांदापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी अध्यक्ष सुभाष तात्या शौचे व अरविंद नांदापूरकर यांनी विर सावरकरांनी देशासाठी दिलेल्या आहुती व योगदानाला उजाळा दिला
यावेळी माजी महापौर सीमा भोळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, जिल्हा पदाधिकारी राजेंद्र मराठे, महेश चौधरी, प्रा. भगतसिंग निकम, राहुल वाघ, मनोज भांडारकर, प्रकाश पंडित, धीरज वर्मा , नगरसेवक सुचीता हाडा, दीपमाला काळे, धिरज सोनवणे, अतुल सिंह हाडा, मनोज काळे, मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे, अजित राणे मंडल पदाधिकारी चेतन तिवारी, शातांराम गावंडे संजय भावसार यंशवतभाई पटेल , शामपाटील कुलकर्णी , आघाडी अध्यक्ष दीप्ती चिरमाडे, उषाताई पाठक, प्रा प्रवीण जाधव, हेमंत जोशी, कुमार श्रीरामे, प्रल्हाद सोनवणे, जयेश पाटील आदिंसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.