कराची : वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या लष्करातील दोन हिंदू अधिकाऱ्यांना प्रथमच लेफ्टनंट कर्नल पदावर बढती देण्यात आली आहे, असे वृत्त पाकिस्तानच्या अधिकृत मीडियाने दिले आहे. मुस्लिमबहुल पाकिस्तानच्या या निर्णयाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. मेजर डॉ. केलाश कुमार आणि मेजर डॉ. अनिल कुमार अशी या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत.
पाकिस्तान आर्मी प्रमोशन बोर्डाने त्यांच्या पदोन्नतीला मान्यता दिल्यानंतर मेजर डॉ. कैलाश कुमार आणि मेजर डॉ. अनिल कुमार यांना लेफ्टनंट कर्नल पदावर बढती देण्यात आली आहे, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले
आहे.
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यातील रहिवासी असलेले कैलाश कुमार हे 2019 मध्ये हिंदू समुदायातील देशातील पहिले मेजर बनले होते. त्यांचा जन्म 1981 मध्ये झाला होता. जामशोरो येथील लियाकत युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ अँड सायन्सेसमधून एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर 2008 मध्ये ते पाकिस्तानी लष्करात कॅप्टन म्हणून सामील झाले होते.
