लखनऊ : वृत्तसंस्था
अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाचे वेड सर्वसामान्य प्रेक्षकांनसोबतच क्रिकेटपटूंनाही लागले आहे. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावरील अल्लू अर्जुनच्या दाढीखालून हात फिरवण्याच्या स्टाइलची अनेकजण कॉपी करत आहे. अल्लू अर्जुनच्या याच स्टाइलची रवींद्र जडेजाने सुद्धा कॉपी केली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या लखनऊ येथे टी-२०मध्ये विकेट पडल्यानंतर जडेजाने फिल्मी स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यासोबत त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, अशा प्रकारचे रिएक्शन आपण सर्वांनीच कुठेतरी पाहिले असेल.
खरं तर, गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने शानदार कामगिरी केली. भारतीय संघाने हा सामना 62 धावांनी जिंकला. या सामन्यात 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला केवळ 137 धावा करता आल्या. यादरम्यान जडेजाने एक विकेटही आपल्या नावावर केली.