चाळीसगाव; प्रतिनिधी: चाळीसगांव मुस्लीम समजाच्या वतीने महाराष्ट्र अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त करण्यात येवून चाळीसगाव येथील तहसिदार यांना निवेदन सादर करण्यात आले.
दि.23 रोजी महाराष्ट्र सरकार मधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका मांडल्याने अशा पध्दतीचा राजकीय सुडबुध्दीने गैरवापार करून खोट्या नाट्या केसमध्ये अटक करून एकप्रकारे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. याचा आम्ही चाळीसगांव मुस्लीम समाजाच्या वतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. सदर निवेदनावर अलताफ जमशेर खान, असलम मिर्झा,लुकमानशहा बशीरशहा, वसिम शे रज्जाक, राजू खान आदींच्य सह्या आहेत.



