Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»चोपडा येथे शेतमाल विक्री केंद्राचे उद्घाटन
    चोपडा

    चोपडा येथे शेतमाल विक्री केंद्राचे उद्घाटन

    saimat teamBy saimat teamFebruary 3, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा ः प्रतिनिधी

    येथील महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी कार्यालयातर्फे ‘विकेल ते पिकेल’ योनजे अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अंतर्गत थेट ‘शेतकरी ते ग्राहक’ संकल्पनेवर आधारीत शेतमाल विक्री केंद्राचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज चौकात पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

    याप्रसंगी आ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आ. प्रा.चंद्रकांत  सोनवणे, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, नगरसेवक, उपविभागीय कृषि अधिकारी दादाराव जाधव, तालुका कृषी अधिकारी आर.आर.चौधरी व नगरपालिका मुख्याधिकारी, अविनाश गागुंडे, पं.स.मुख्याधिकारी श्री.कासोदे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक चोपडा महेंद्र साळुंखे, महेंद्र महाजन, कृषी सहाय्यक तसेच तालुका कृषि विभागातील सर्व मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक उपस्थित होते.

    याप्रसंगी बळीराजा सेंद्रिय शेती गट हातेड, श्रीसमर्थ सेंद्रिय गट चुंचाळे, भूमिपुत्र शेतकरी स्वयंम साहाय्यता गट चुंचाळे, उनपदेव शेतकरी गट अडावद यांच्यामार्फत सेंद्रीय भाजीपाला विक्री करण्यात आले. त्यात मशरूम, ब्रोकोली, ओली हळद या शेतमालाला ग्राहकांनी पसंती दिली. तसेज ग्राहकांनी शेतकरी गटाचे संपर्क नंबर शेतकर्‍यांकडून घेतले. या कार्यक्रमात, शेवगा, कांदा, टोमॅटो, पेरू, तूरडाळ, उडीद डाळ, चणा डाळ, कारले, दुधी भोपळा, दोडके, शेपू पालक, मधुमका, गाजर, कागदी लींबु, वांगे खरेदीस ग्राहकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Chop : ट्रॅक्टर अपघातात बाप-लेकाची एकाच दिवसात शोकांतिका

    February 7, 2026

    Jalgaon : फुले कृषी महोत्सव 2026 : केळीच्या ८० वाणांचे थेट प्रात्यक्षिक

    February 3, 2026

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.