भुसावळ : प्रतिनीधी
येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पी .ओ .नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील एनमुक्टो प्राध्यापक संघटनेच्या स्थानिक शाखेच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच पार पडला.यावेळी प्राध्यापक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली . अध्यक्षपदी उपप्राचार्य प्रा .ए. डी. गोस्वामी, उपाध्यक्ष प्रा . एस पी झनके, सचिव प्रा. प्रमोद अहिरे यांची वर्णी लागली.
यावेळी नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपप्राचार्य प्रा. एस. व्ही .पाटील तर निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. एस . व्ही. पाटील यांनी सभागृहासमोर कार्यकारिणी सदस्यांची पदे वाचून दाखवली व सभागृहाला अधोरेखित केले की आपल्या महाविद्यालयाची परंपरा निवडणूक घेण्याची नाही. ज्या प्राध्यापकांना स्वेच्छेने कार्यकारिणीवर काम करायचे आहे. जे प्राध्यापक प्राध्यापकांचे प्रश्न मिटविण्यासाठी वेळ देतील अशा प्राध्यापकांनी पुढे यावे व त्यात सर्वानुमते येत्या दोन वर्षासाठी नवीन कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी उपप्राचार्य प्रा .ए. डी. गोस्वामी, उपाध्यक्ष प्रा . एस पी झनके, सचिव प्रा. प्रमोद अहिरे, सहसचिव, प्रा. अनिल हिवाळे, खजिनदार प्रा .डॉ. किरण वारके, अंतर्गत हिशोब तपासणीस डॉक्टर ममताबेन पाटील, जिल्हा प्रतिनिधी प्रा. जे .एफ. पाटील, केंद्रीय प्रतिनिधी प्रा. ई. जी .नेहेते, महिला प्रतिनिधी प्रा. स्मिता चौधरी, सेवानिवृत्त प्राध्यापक प्रतिनिधी प्रा. सुधीर नेहेते, यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
निवडणूक कार्यक्रमापूर्वी सर्वप्रथम स्थानिक शाखेचे माजी सचिव डॉ. एस .पी. झनके यांनी सभागृहासमोर इतिवृत्त मांडले त्यात मागील दोन वर्षात संघटनेची वाटचाल लेखाजोखा संघटनेने मिळवलेले यश त्यावर प्रकाश टाकला त्यानंतर प्राध्यापक संघटनेच्या केंद्रीय कार्यकारणी चे उपाध्यक्ष सिनेट सदस्य प्रा. ई. जी. नेहेते यांनी प्राध्यापक संघटनेने केलेल्या कार्याचा इती वृत्तांत मांडला त्यात महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ यांनी शासनाबरोबर वेळोवेळी भेटी घेऊन प्राध्यापकांचे प्रश्न सोडविले काही प्रश्न सुटले आहेत काही प्रश्न बाकी आहेत परंतु आपण सकारात्मक विचाराचे आहोत लवकरच प्रश्न सुटतील अशी आशा व्यक्त करून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधि सभेतील घडामोडींवर प्रकाश टाकला त्यात त्यांनी विद्यापीठात उच्च शिक्षण क्षेत्रात काम करणारे प्राध्यापक विद्यापीठाचे आधारस्तंभ असतात परंतु नवीन कायद्याने आपले नेतृत्व कमी केले आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला त्यानंतर स्थानिक शाखेतील ज्या प्राध्यापकांनी गेल्या दोन वर्षात विशेष प्राविण्य मिळविले ज्यांची विद्यापीठाच्या विविध प्राधी करावर निवड झाली प्राध्यापक पदी पदोन्नती झाली. अशा प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. प्रा. ई. जी. नेहेते यांची महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या सदस्यपदी निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रसंगी सचिव प्रा एस पी झनके यांनी नवीन कार्यकारिणीकडे कार्यकारिणीचे दप्तर सुपूर्द केले. कार्यकारिणीची सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे यांनी स्थानिक शाखेला सभा घेण्याची परवानगी देऊन सभागृह उपलब्ध करून दिले त्या बद्दल त्यांचे आभार मानले गेले.