जळगाव ः प्रतिनिधी
‘ब’ सत्ता प्रकार व अन्य कोणाताही सत्ता प्रकार यामध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीचे भुगवटादार वर्ग 1 या धारणाधिकारामध्ये रूपांतर करण्यासाठी एका वर्ष मुदत वाढ द्यावी अश्या आशयाचे निवदेन जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष श्यामकांत तायडे यांनी मुंबई येथे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिले.
कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. ‘ब’ सत्ता प्रकारातील निवासी जागा या गोरगरीब व मध्यमवर्गीय लोकांच्या आहेत. त्यामुळे नजराणा भरण्यासाठी शहरातील एक वर्ष मुदतवाढ द्यावी अशी आग्रही मागणी काँग्रेस महानगराध्यक्ष श्यामकांत तायडे यांनी लावुन धरली त्यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निवेदन अभ्यावुन मान्यता देण्याचे आश्वासन दिले व सकारात्मकता दाखविली.
‘ब’ सत्ता प्रकार अथवा अन्य कोणत्याही सत्ता प्रकार म्हणून नोंदवलेल्या निवासी, कृषिक, वाणिज्य, औद्योगिक प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या जमिनीचे भोगवटदार वर्ग या धारणाधिकारामध्ये रूपांतर करण्यासाठी तसेच नगरभूमापन हद्दीतील जमिनी कब्जे हक्काने रहिवासी प्रयोजनार्थ प्रदान करण्यात आल्या आहेत. या जमिनीच्या बाजारमूल्याच्या 15 टक्के नजराणा 8 मार्चपर्यंत शासन जमा करण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. तसेच 9 मार्च नंतर नजराणा रक्कम 60 टक्के वाढणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नजराणा भरण्याची मुदत एक वर्ष वाढवून मिळण्याची मागणी केली. त्यावर महसूलमंत्र्यांनी मुदतवाढ देण्याची ग्वाही दिली. ही मुदतवाढ मिळाल्यास हजारो नागरीकांना दिलासा मिळणार आहे.