Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल ‘फाईव्ह स्टार रेटिंग’ पुरस्काराने सन्मानित
    चोपडा

    पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल ‘फाईव्ह स्टार रेटिंग’ पुरस्काराने सन्मानित

    saimat teamBy saimat teamFebruary 3, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा ः प्रतिनिधी

    सीईडी फाऊंडेशन व एमएसएमई भारत सरकारतर्फे सर्वेक्षण निकषानुसार राष्ट्रीय पातळीवर सीबीएसई पॅटर्नच्या २४००० विद्यालयापैकी निकषपूर्तता करणार्‍या ९०० विद्यालयातर्फे ‘५ स्टार रेटिंग’ मानांकनसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यामध्ये टॉप १०० विद्यालयांची रेटिंगसाठी निवड झाली. यामध्ये पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल चोपडा या सीबीएसई विद्यालयाने राष्ट्रीय पातळीवर टॉप १०० मध्ये ५७ वे स्थान प्राप्त केले.

    विद्यालयातील भौतिक सुविधा व परिसर, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राबविण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, सुदृढ विद्यार्थी निर्मितीसाठी क्रीडा क्षेत्रातील विविध प्रकारच्या खेळात मिळविलेले यश, विविध स्पर्धा परीक्षेतील कामगिरी, विद्यार्थ्यांना परीक्षा भीती घालविण्यासाठी केलेली तणावमुक्त वातावरण निर्मिती, शालेय स्वच्छता व पर्यावरण रक्षणासाठी केलेली भरीव कामगिरी अशा १०० विविध निवडीच्या निकषांवर ‘फाईव्ह स्टार रेटिंग’ हे स्थान प्राप्त झाले.त्यामुळे पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

    राष्ट्रीय स्तरावरील हा सहावा पुरस्कार सोहळा. लिला एम्बुंलेन्स, गुरुग्राम दिल्ली येथे मालदीवचे शिक्षणमंत्री डॉ.अब्दुल रशिद, सीबीएसई बोर्डाचे सचिव डॉ.अनुराग त्रिपाठी, सीबीएसई बोर्डाचे परीक्षा विभाग प्रमुख संन्यम भारद्वाज, राष्ट्रीय मुक्तविद्यालय शिक्षण संस्थानचे चेअरमन सी.बी.शर्मा, सीईडीचे संस्थापक चेअरमन डॉ.प्रियदर्शी नायक या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे संचालक पंकज बोरोले व प्राचार्य मिलिंद पाटील यांनी मान्यवरांच्याहस्ते पुरस्कार व प्रमाणपत्र स्विकारले. उत्तर महाराष्ट्रातील निवड झालेल्या पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलने अगदी अल्पावधीतच आपली सर्व  शैक्षणिक गुणवत्ता उंचावली आहे. विद्यालयात सुजज्ज सर्व अत्याधुनिक सुविधा युक्त अशी भव्य होस्टेलची व्यवस्था निसर्गरम्य स्वतंत्र परिसरात केली आहे. संस्था व सर्व शिक्षक विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेतात. ही बाब या मानांकन प्राप्तीसाठी सकारात्मक ठरली आहे.

    या विद्यालयाच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले, नारायण बोरोले, गोकुळ भोळे, भागवत भारंबे, शिक्षण विभाग यांनी प्राचार्य मिलिंद पाटील व शिक्षकवृंद कर्मचारी यांचे अभिनंदन केले. संस्थेच्या विविध शैक्षणिक विभागाचे प्रमुख एम.व्ही पाटील, व्ही.आर.पाटील, प्राचार्य किशोर पाठक, मुख्याध्यापिका निता पाटील, बालवाडी प्रमुख रेखा पाटील यांनी विद्यालयात सर्व संचालक मंडळ, प्राचार्य मिलिंद पाटील व सर्व शिक्षकांचा सत्कार व अभिनंदन केले. या सन्मानाने शैक्षणिक दर्जा जोपासणारे फाईव्ह स्टार विद्यालय म्हणून परिसरात ख्याती झाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Chop : ट्रॅक्टर अपघातात बाप-लेकाची एकाच दिवसात शोकांतिका

    February 7, 2026

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026

    chop : माहेरी आलेल्या महिलेची विहिरीत उडी दोन मुलांसह मृत्यू

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.