भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील रेकॉडवरील गुन्हेगाराला भुसावळ शहरातून एक वर्षेसाठी हद्दपार केले आहे.
याबाबत माहिती अशी की, भुसावळ बाजारपेठ पोलीस हद्दीत राहणारा आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल राजू टाक रा. जामनेर रोड, वाल्मिक नगर, भुसावळ याच्याविरोधात मार्च २०१९ मध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. यासंदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन यांच्याकडून मार्च २०१९ मध्ये पोलीस कायदा कलम ५६ अन्वये हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडून प्राथमिक चौकशीकामी हा अहवाल उपविभागीय पोलिस अधिकारी भुसावळ यांच्याकडे देण्यात आला. गुन्हेगार विशाल राजू टाक याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्याची चौकशी केल्यानंतर प्राथमिक चौकशी अहवाल प्रांताधिकारी यांना सादर करण्यात आला. यादरम्यान उपविभागीय दंडाधिकारी यांनी गुन्हेगार विशाल राजू टाक याला एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहे. हद्दपार करण्याच्या कामी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मंगेश गोटला, सुनील सोनवणे, गजानन वाघ यांनी कारवाई केली