जळगाव ः प्रतिनिधी
स्वच्छतेचा मूलमंत्र देणारे राष्ट्रसंत श्री.गाडगेबाबा यांच्या 146 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला निस्वार्थ सेवा प्रतिष्ठाण, यांच्या संयुक्त उपक्रम जळगाव येथिल मेहरून परिसर व तंत्या भिल वस्तीत शाळाबाह्य व कचरावेचक मुले यांना आपले घर व परिसर स्वच्छतेची शपथ देऊन स्वच्छतेसाठी लाईफबॉय साबण, पेपसोडन्ट टूथ पेस्ट, टूथ ब्रश व बिस्कीटचा पुडा असे किट वाटप करण्यात आले. गाडगेबाबा युवा विचारमंचचे अध्यक्ष गणेश सपके, जिल्हा लॉड्री असोशियशनचे अध्यक्ष मनोज निंबाळकर, नितीन पाटील, जयंता वाघ, भरत जाधव, प्रवीण लोखंडे यांचे सहकार्य लाभले सर्व मुलांना स्वच्छतेची शपथ नीलेश निंबाळकर यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक निस्वार्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीष शिरसाळे यांनी केले. दीपक खंगार यांनी परिश्रम घेतले तर आभार महेंद्र जाधव यांनी मानले.