शेअर बाजारावर युद्धाचे सावट सेन्सेक्स हजार अंकांनी गडगडला

0
21

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आहे.युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळले जाऊ शकत नाही असे पुतिन म्हणाले आहेत. या घोषणेनंतर जगभरातील आर्थिक व्यवस्थेवर परिणाम दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी बाजार उघडताच हजार अंकानी घसरला. निफ्टीतही मोठी घसरण नोंदवण्यात आली. युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या सर्व एक्सचेंजवर ट्रेडिंग बंद करण्यात आलं आहे.
रशिया आणि युक्रेनमधील वाढता तणाव आणि युक्रेनची राजधानी आणि इतर भागात बॉम्बस्फोट झाल्याच्या बातम्यांचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. आठवड्याच्या चौथ्या दिवशी भारतीय बाजारांची सुरुवात लाल चिन्हाने झाली. सेन्सेक्समध्ये 1426.28 अंकांची म्हणजेच 2.49 टक्क्यांची घसरण झाली आणि निर्देशांक 55805.78 च्या पातळीवर उघडला. निफ्टीच्या टॉप घसरण झालेल्या कंपन्यांच्या यादीत यूपीएल, टाटा मोटर्स, इंडलइंड बँक, टाटा स्टील आणि आयसीआयसीआय बँकेचा समावेश आहे. बुधवारी, डाऊ जोन्स 464 अंकांनी घसरून 33131 वर बंद झाला होता. त्याच वेळी नॅस्डॅक्स 2.57 टक्के म्हणजेच 344 अंकांनी घसरला. या घसरणीमुळे नॅस्डॅक्स 13037 या पातळीवर बंद झाला. एवढेच नाही तर एसअँडपीमध्येही देखील 79 अंकांची घसरण नोंदवली गेली. दुसरीकडे  वर सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1175 रुपयांनी वाढून 51554 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर चांदीचा दर 65824 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here