चितोडा येथे मोफत ई-श्रम कार्ड वितरण अभियान सुरू

0
52

यावल : प्रतिनिधी
यावल येथील युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ.कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली मोफत ई-श्रम कार्ड वितरण चितोडा येथे मोफत वाटप करण्यात आले. हे अभियान दाहावे टप्प्यात पोहोचले असून या उपक्रमाला चितोडा गावातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. या अभियानास एकूण 346 लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला.
यावल तालुक्यातील चितोडा गावातील नागरीकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा तात्काळ लाभ मिळावा, याकरीता श्रमजिवी कुटुंबास अत्यावश्‍यक असणारे ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियानास दहावे सत्राला सुरुवात करण्यात आली. हे अभियान चितोडा येथील ग्रामपंचायत जवळ घेण्यात आले. यावेळी मोफत ई-श्रम कार्ड अभियानाचे उद्घाटन डॉ.कुंदन फेगडे यांच्याहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच सलिमाताई तडवी, उपसरपंच भावनाताई धांडे, अतुल पाटील, डिंगाबर महाजन, दिनेश कुरकुरे, राजू धांडे, राजू कुरकुरे, तुकाराम पाटील, विजय पाटील, विलास धांडे, सलीम तडवी, दिनेश धांडे, बेबिताई पाटील, ज्येोती पाटील, मनोज टोंगाडे, मनोज पाटील, निखील पाटील, सचिन पाटील, ऋषिकेश पाटील, निखील पाटील, स्वप्नील धांडे, तुषार पाटील, प्रफुल पाटील, दीपक भंगाळे, ओम पाटील आदींची उपस्थिती होती. अभियानास सागर लोहार, मनोज बारी, विशाल बारी, हर्षवर्धन मोरे, अक्षय राजपूत, चेतन कापुरे, शुभम सोनवणे यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here