पॉर्नोग्राफी केस प्रकरणी आणखी चार आरोपींना अटक.

0
35

मुंबई : प्रतिनिधी: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पॉर्नोग्राफी केस प्रकरणी मोठी अपडेटसमोर येत आहे. मुंबई क्राईम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने आणखी चार आरोपींना अटक केली. वर्सोवा येथून एका आरोपीला तर बोरिवली परिसरातून तीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यापैकी एक कास्टिंग डायरेक्टर आहे, आणि बाकीचे 3 त्याचे सहकारी आहेत.
वर्सोवा येथून एक आणि बोरिवली परिसरातून तीन आरोपींना अटक करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यापासून चौघेही फरार होते. या आरोपींवर मॉडेल्सना पॉर्न फिल्म शूट करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.
अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे समोर आली आहेत. नरेशकुमार रामावतार पाल (29),  सलीम गुलाब सय्यद (30),  अब्दुल गुलाब सय्यद (24), अमन सुभाष बरनवार (22) अशी त्यांची नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here