जळगांव (प्रतिनिधी):- अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत व श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रगती विद्यामंदिर शाळेत ऑनलाईन तसेंच ऑफलाईन पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे सचिव सचिन दुनाखे यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल यांनी छत्रपतीचे कार्य प्रेरणादायी आहे त्यांच्या कार्याचा अभ्यास करावा व जीवनात त्याचा अमल करावे असे मत व्यक्त केले. अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन अलका करणकर तर आभार ज्योती बागुल यांनी केले.
याप्रसंगी मुख्याध्यापक शोभा फेगडे,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.