धुळे प्रतिनिधी फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमीत्त दि.१७ फेब्रुवारी रोजी रात्री व्याख्याते शिवश्री रामेश्वर तुकाराम भदाणे यांचे आम्हाला शिवराय समजले का ? या विषयांवर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिेषद अध्यक्ष बाळासाहेब मनोहर भदाणे उपस्थित होते.
धुळे तालुक्यातील नगांव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमीत्त छ.शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचावा यासाठी व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन नगांव येथील नवजीवन व्यायामशाळेच्या तरुण मंडळातर्फे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे व्याख्याते मुळचे नगांव येथील व सद्यास्थित अमळेनर जि.जळगांव येथील शिवश्री रामेश्वर तुकाराम भदाणे यांनी सद्या युगाला शिवराय नेमके समजले का? या विषयावर व्याख्यान केले.
पुढे बोलतांना शिवश्री रामेश्वर भदाणे म्हणालेत की, शिवजयंती नुसते डीजे लावून साजरी करण्याची नसून तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घरा घरात कसे पोहचविता येतील याकडे लक्ष देणे गरजेचे. छपत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे घरा घरात पोहिचणे म्हणजे खरी शिवजयंती होय. आज सर्व भरकटून गेलेले आहेत, भ्रष्टाचार, अत्याचार, चोऱ्या-माऱ्या वाढल्यात त्यामुळे अस्थितरता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवाजी महराजांचा आदर्श डोळयासमोर ठेवला पाहिजे. असे यावेळी बोलतांना म्हणालेत.
शिवजयंती निमीत्त आयोजीत व्याख्यानाचे अयोजन नवजीवन व्यायाम शाळेच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जेष्ठे नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष बाळासाहेब मनोहर भदाणे, जेष्ठ ग्रामस्थ तुकाराम देवचंद पाटील, रविंद्र देवचंद पाटील, यांच्यासह गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बन्सीलाल वालजी पाटील, समाधान रोहिदास पाटील यांनी प्रयत्न केलेत.जि.प.सदस्य रामदादा भदाणे यांचे स्विय सहाय्यक