Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»अमरावतीचे महापालिका आयक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईहल्ला
    राज्य

    अमरावतीचे महापालिका आयक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईहल्ला

    saimat teamBy saimat teamFebruary 9, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमरावती, वृत्तसंस्था । अमरावतीचे महापालिका आयक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईहल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. आयुक्त आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकत त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. काही महिलांनी अचानक येत आयुक्त आष्टीकर यांच्यावर शाईफेक केली.

    अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यावरुन राजकारण तापलं आहे. 12 डिसेंबरला युवा स्वाभिमानच्या काही कार्यकर्त्यांनी राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. पण त्यानंतर 16 डिसेंबरला तो पुतळा हटवण्यात आला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती.

    पुतळा का हटवला याचा जाब विचारत काही महिलांनी आयुक्त आष्टीकर यांच्यावर शाई फेकली. पालिकेचे सुरक्षा रक्षक तात्काळ आष्टीकर यांच्या बचावासाठी धावले आणि प्रसंगावधान दाखवून शाईफेक करणाऱ्या महिलांना कार्यालयाबाहेर काढलं. पण यामुळे काही वेळ तणावाचं वातावरण होतं.

    पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर हे पालिका आवारात सुरक्षा रक्षकासोबत पाहणी करत होते. त्यावेळी तिथे अचानक आलेल्या महिलांनी घोषणाबाजी करत आयुक्तांवर शाई फेकली.

    दरम्यान, ज्यांनी अमरावती आयुक्तांवर शाई फेकली त्यांच्या पाठिशी रहाणार असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत असल्याचा आरोपही नवनीत राण यांनी केला आहे.

    नेमकं प्रकरण काय ?
    अमरावतीतील राजापेठ उड्डाणपुलावर युवा स्वाभिमान पक्षाने 12 डिसेंबरला मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. पण हा यासाठी कोणतीही परवानगी घेतल्याने 16 डिसेंबरला पोलीस बंदोबस्तात हा पुतळा हटवण्यात आला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    महा-तापमान! राज्यावर पुढील ४ दिवस ‘हिटवेव्ह’चे संकट; विदर्भासह मराठवाडा होरपळणार, वर्ध्यात शाळांना सुट्टी जाहीर

    April 15, 2026

    ‘आयएनएस ध्रुव’ची तैनाती; पाकिस्तानच्या संशयास्पद हालचालींना भारताचे प्रभावी प्रत्युत्तर

    April 15, 2026

    इराण-अमेरिका युद्धबंदी चर्चेला पहिल्याच फेरीत अडथळा; दुसऱ्या बैठकीकडे जगाचे लक्ष

    April 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.