Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»जळगावात ७२ वर्षीय वृद्धाच्या खिशातुन मंगळसूत्र लांबविले
    क्राईम

    जळगावात ७२ वर्षीय वृद्धाच्या खिशातुन मंगळसूत्र लांबविले

    saimat teamBy saimat teamFebruary 3, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । एका ७२ वर्षीय वृद्धाच्या खिशातून पंधरा हजार रुपये किमतीची मंगलपोत लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जळगाव शहरातील आकाशवाणी चौक ते विद्यूत कॉलनी दरम्यान ७२ वर्षीय वयोवृध्दाच्या खिश्यातून १५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चार जणांनी जबरी हिसकावून लांबविल्याची घटना बुधवारी २ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख जलील शेख इब्राहिम (वय ७२, रा. पंचशील नगर, तांबापूर जळगाव) हे कामाच्या निमित्ताने बुधवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात आले होते. त्यांचे काम आटोपून ते विद्यूत कॉलनीकडे जात असतांना अज्ञात चार जण त्यांच्या समोर उभे राहिले. दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या खिश्यातील १५ हजार रूपये किंमतीचे मंगळसुत्र जबरी हिसकावून लांबविले. त्यांनी आरडाओरड केली परंतू तोपर्यंत अज्ञात चार चोरटे पसार झाले होते.

    फिर्यादीं शेख जलील यांनी तात्काळ रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी ८ वाजता रामानंदनगर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोउनि शांताराम पाटील करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.