Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»३०० कोटींच्या क्रिप्टो करन्सीसाठी अपहरण, मास्टरमाईंड पोलीस शिपायासह ७ जणांना अटक
    क्राईम

    ३०० कोटींच्या क्रिप्टो करन्सीसाठी अपहरण, मास्टरमाईंड पोलीस शिपायासह ७ जणांना अटक

    saimat teamBy saimat teamFebruary 2, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पिंपरी-चिंचवड, वृत्तसंस्था । एक धक्कादायक बातमी. 300 कोटी रुपयांच्या क्रिप्टो करन्सीसाठी अपहरण करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने 300 कोटींच्या क्रिप्टो करन्सीसाठी त्याच्या साथीदारांसोबत एका व्यक्तीचे अपहरण केल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोलीस शिपायासह सात जणांना अटक केली आहे.

    संबंधित पोलीस शिपाई हा पुणे पोलीस दलात सायबर विभागात कार्यरत असताना एका व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात क्रिप्टो करन्सी असल्याचे त्याला समजले होते. पैशाच्या लालसेपोटी त्या व्यक्तीचे अपहरण केले तर मोठ्या प्रमाणात क्रिप्टो करन्सी आणि पैसे मिळू शकतात, असे विचार त्याच्या मनात घोळू लागले. त्यामुळे त्याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून त्या व्यक्तीचे अपहरण केले.

    मात्र, वाकड पोलिसांनी अपहरणाचा मास्तरमाइंड असलेल्या पोलिसाला सापळा लावून बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे हा मास्टरमाईंड पोलीस शिपाई असल्याचे समोर आल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली. दिलीप तुकाराम खंदारे असे अटक केलेल्या मास्टर माईंड आरोपी नाव आहे. त्याच्यासह सुनील राम शिंदे, वसंत श्यामराव चव्हाण, फ्रान्सिस टिमोटी डिसूझा, मयुर महेंद्र शिर्के आणि प्रदीप काशिनाथ काटे, शिरीष चंद्रकांत खोत, संजय ऊर्फ निकी राजेश बंसल यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिली.

    आरोपींनी विनय सुंदरराव नाईक यांचे 14 जानेवारी रोजी ताथवडे येथील एका हॉटेलमधून अपहरण केले होते. याप्रकरणी रफिक अल्लाउद्दीन सय्यद यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर तांत्रिक विश्लेषण सुरु केले. दरम्यान पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण आरोपींना लागली. त्यांनी नाईक यांना वाकड भागात सोडले आणि आरोपी पळून गेले. आरोपींनी बिट कॉइन आणि आठ लाख रुपयांची मागणी केल्याचे नाईक यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक बाबींचा आधार घेत आरोपीना अटक केली, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.