नाहाटा महाविद्यालयात केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२०२३ कार्यशाळा संपन्न

0
12

भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ येथील कला ,विज्ञान आणि पु .ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग आणि नियोजन अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२०२३ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . मीनाक्षी वायकोळे उपस्थित होते. उद्घाटक म्हणून भुसावळ शहरातील नामांकित चार्टर्ड अकाउंटंट मुकेश अग्रवाल त्यांच्या समवेत प्रसिद्ध उद्योजक राजीव शर्मा तसेच अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक माजी विभाग प्रमुख प्रा. व्ही. डी. पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. निलकंठ भंगाळे, डॉ. ए. डी. गोस्वामी नियोजन अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा. संदेश धूम व्यासपीठावर उपस्थित होते. उद्घाटन समारंभ संपन्न झाल्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषण केले. त्यात त्यांनी अर्थसंकल्प हा प्रत्येक व्यक्तीच्या जिव्हाळ्याचा विषय असून अर्थसंकल्पाचा देशातील प्रत्येक नागरिकाच्या आर्थिक जीवनावर परिणाम होत असतो त्यासाठी अर्थसंकल्प सर्वसमावेशक असावे, अशी इच्छा त्यांनी यावेळी प्रकट केली. यावेळी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी नीता अरुण पाटील हिने अर्थशास्त्र विषयातील सेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल अर्थशास्त्र विभागातर्फे मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्या अर्थसंकल्पाचे अवलोकन करून अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली. त्यात सर्वप्रथम राजीव शर्मा यांनी आपले मत मांडले. त्यात त्यांनी अर्थमंत्र्यांनी पुढची २५ वर्षे डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर केलेला आहे. देशातील लघु उद्योग धंद्यांना झुकते माप दिले आहे संकल्पना चांगली आहे. परंतु त्याचा किती परिणाम होतो हे पाहणे गरजेचे आहे. पोस्ट ऑफिस मध्ये कोअर बँकिंग ची संकल्पना चांगली आहे. परंतु त्यासाठी नेट सुविधा उपलब्ध आहे का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. केंद्रीय अर्थमंत्री डिजिटल अंदाजपत्रक मांडत आहेत परंतु आजही बँकेत गेल्यानंतर चार कागद जमा केल्याशिवाय काम होत नाही असे विचार त्यांनी यावेळी मांडले.

तसेच त्यांनी देशातील पर्यावरणाचा नाश थांबवायचा असेल तर सोलर ऊर्जा च्या संदर्भात सरकारने धोरणे उदार केली पाहिजे असे मत मांडले त्यानंतर कार्यशाळेचे उद्घाटक मुकेश अग्रवाल यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चेत अर्थसंकल्पाचे स्वागत करून मला अपेक्षित अर्थसंकल्प मांडलेला आहे सरकारने उत्पन्न कराच्या संदर्भात जरी काही मत मांडले नसले तरी येत्या तीन वर्षात ॲडिशनल उत्पन्नाच्या संदर्भात चांगले धोरण सरकार राबवत आहे असे मत व्यक्त केले शेवटी “बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो” या ओळींची आठवण करून आपल्या चर्चेला पूर्णविराम दिला शेवटी प्रा. व्ही. डी .पाटील यांनी आपले मत मांडले त्यांनी सर्वप्रथम केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत करून आजचा अर्थसंकल्प हा करेक्शन स्वरूपाचा आहे आणि पुढील भारताच्या भविष्यासाठी आणि पायाभूत संरचना विकासावर आधारलेला हा अर्थसंकल्प असून याचे नक्की देशाच्या अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन अनुकूल परिणाम होतील अशी इच्छा प्रकट केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विलास सोळुंके यांनी केले प्रास्ताविक एस.टी. धूम यांनी केले आभार प्रदर्शन डॉ. किरण वारके यांनी मांडले. कार्यक्रमाच्या संपूर्ण आभार प्रा .डॉ. ललित तायडे यांनी केले.

यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. व्ही .पाटील डॉ. बी. एच .बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रा .कोमल सोनवणे प्रा .जे .पी. अडोकार प्रा. उज्वला महाजन यांनी परिश्रम घेतले . कार्यशाळेत डॉ .जे. एफ .पाटील प्रा .डॉ .के. के .अहिरे वाणिज्य विभागातील आणि मानव्य विद्याशाखेतील प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते कार्यशाळा ऑनलाइन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेण्यात आली यासाठी संगणक विभागातील प्रा.हर्षल पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here