उष्माघाताने मुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळा येथील 90 मेंढ्या दगावल्या

0
119
उष्माघाताने मुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळा येथील 90 मेंढ्या दगावल्या-www.saimatlive.com

साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी 

तालुक्यातील काकोडा येथील रहिवाशी मेंढपाळ नामदेव चोपडे, भरत मदने, भोजू मदने, ज्ञानेश्वर मदने यांचे सर्वांचे मिळून जवळपास 90 ते 100 मेंढी पशुधन उष्मघात मुळे थेरोळा शिवारात मृत्यू मुखी पडलेल्या होत्या. घटनेची माहिती कळताच त्याठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदार गिरीश वखारे , पशू वैद्यकीय अधिकारी यांची 8 ते 9 जणांची टीम, मंडळ अधिकारी, तलाठी यांना सोबत घेऊन भेट दिली.

या घटनेची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्हिडिओ कॉल वरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री डॉ राधाकृष्ण विखेपाटील, मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना फोन द्वारे दिली.
शासन व प्रशासन आपणास सर्वोतोपरी आपणा सोबत आहे. हवी ती मदत आम्ही आपणास करणार या शब्दात मेंढपाळ बंधवास दिलासा देत आमदार पाटील यांनी सर्वांना आदेश देत उभे राहून पंचनामे व पीएम करून घेतले.

यावेळी आमदार पाटील यांच्या समवेत अशोक कांडेलकर, तालुका प्रमुख नवनीत पाटिल, विनोद पाटिल, पंकज पांडव, रणजित गोयनका, सतिष नागरे, विनोद चौधरी, दिपक वाघ , दिलीप भोलानकर, अविनाश वाढे, पंकज धाबे, राहुल खिरळकर, पांडुरंग तांबे, योगेश मूलक, गणेश सोनवणे, विष्णु पाटिल, शेख फारुख, जावेद खान परिसरातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here