पहुरच्या आर.टी.लेले महाविद्यालयाचा ८९ टक्के निकाल

0
42

साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर

येथील पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित आर. टी.लेले. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी कला शाखेचा निकाल ८९. १८ टक्के लागला आहे. त्यात साक्षी रामेश्‍वर पाटील हिने ६९. ५० टक्के गुण मिळवत महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

आर.टी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून फेब्रुवारी मार्च २०२४ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ३७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. साक्षी रामेश्‍वर पाटील हिने ६९. ५० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. त्या संचालक ॲड. एस. आर. पाटील यांच्या स्नूषा आहेत. विवाहानंतर त्या आपले शिक्षण पूर्ण करीत आहेत.

आरती ज्ञानेश्‍वर सोनवणे हिने ६८. ८३ टक्के गुण मिळवून द्वितीय, उषा ज्ञानेश्‍वर भिवसने हिने ६८. ५० टक्के गुण मिळवून विद्यालयातून तृतीय आली. तसेच गायत्री शंकर क्षीरसागर हिने ६५. ८३ टक्के तर तृप्ती गजानन पाटील हिने ६५. १७ टक्के गुण मिळविले. महाविद्यालयातून पहिल्या पाचमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पहुर ग्रुप एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, सचिव डॉ.अनिकेत लेले, उपाध्यक्ष साहेबराव देशमुख, संचालक राजधर पांढरे, संचालक ॲड. एस. आर. पाटील, मुख्याध्यापक एस.आर. सोनवणे, पर्यवेक्षक एम. बी. पवार, संस्था प्रतिनिधी तथा वरिष्ठ लिपिक किशोर पाटील, माजी मुख्याध्यापक एस.व्ही.पाटील, आर.बी. पाटील, कनिष्ठ लिपिक शरद पाटील, वर्गशिक्षक एम. एस.आगारे यांच्यासह शिक्षक वृंद, संचालक मंडळाने कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here