Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Mumbai : मालाडमध्ये पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; बांधकाम सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
    जळगाव

    Mumbai : मालाडमध्ये पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; बांधकाम सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    saimatBy saimatMarch 20, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / मुंबई / प्रतिनिधी

    मालाड पूर्व येथील कुरार व्हिलेज परिसरात एक दुर्दैवी घटना घडली असून बांधकामासाठी खोदलेल्या आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून बांधकाम स्थळांवरील सुरक्षा उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

    दिव्यांश राजेश मौर्य (वय ८) असे मृत मुलाचे नाव आहे. तो आंबेवाडीतील चगन पटेल चाळीत राहात होता. घराबाहेर खेळत असताना त्याचा चेंडू जवळच सुरू असलेल्या बांधकामाच्या खड्ड्यात गेला. हा खड्डा पाण्याने भरलेला असल्याने चेंडू काढण्यासाठी गेलेल्या दिव्यांशचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडला.

    घटनेची माहिती मिळताच कुरार व्हिलेज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने मुलाला बाहेर काढून तातडीने कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

    दरम्यान, संबंधित खड्डा मौली कन्स्ट्रक्शन कंपनीने खोदल्याची माहिती समोर आली आहे. बांधकामस्थळी योग्य सुरक्षा उपाययोजना करण्यात निष्काळजीपणा झाला का, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी बांधकाम स्थळांवर कडक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Nashik sexual assault case: अशोक खरात प्रकरणात न्यायाची मागणी करत शिवसेनेचा आक्रमक हस्तक्षेप

    March 20, 2026

    Chalisgaon : करगाव रस्त्यावरील रेल्वे बोगदे बंद; पाहणी नंतर लवकरच सुरू होणार, नव्या अंडरपासाचीही तयारी

    March 20, 2026

    Premium Petrol Price Today Updates : जागतिक तेल किंमती वाढल्यामुळे भारतात प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ; साध्या पेट्रोल व डिझेलवर परिणाम नाही

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.