बस अपघातातील मृतांपैकी 8 जणांची ओळख पटली, 40 प्रवासी होते स्वार

0
19

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात सोमवारी सकाळी इंदूर-खरगोनदरम्यान भीषण अपघात झाला. इंदूरहून पुण्याकडे (अमळनेर) जाणारी बस धामनोद येथील खलघाटाजवळ खळखळणाऱ्या नर्मदा नदीत कोसळली. रात्री 10 ते 10.15 च्या दरम्यान खलघाट येथील दुपदरी पुलावर एका वाहनाला ओव्हरटेक करताना बस अनियंत्रित झाली. चालकाचा तोल गेला आणि बस रेलिंग तोडून नदीत पडली.

बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह 40 प्रवासी होते. आतापर्यंत 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यामध्ये 8 पुरुष, 4 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी 15 प्रवाशांना जिवंत बाहेर काढल्याचा दावा केला आहे. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकाने सांगितले की, आतापर्यंत एकही प्रवासी जिवंत सापडला नाही.

मृतांपैकी 8 जणांची ओळख पटली

एसटी महामंडळाकडून प्राप्त माहितीनुसार,

1.चेतन राम गोपाल जांगिड़, रा. नांगल कला, गोविंदगढ़, जयपूर राजस्थान.

2. जगन्नाथ हेमराज जोशी, वय 70 वर्षे, रा. मल्हारगढ़, उदयपूर, राजस्थान.

3. प्रकाश श्रवण चौधरी, वय 40 वर्षे, रा. शारदा कॉलोनी, अंमळनेर, जळगाव, महाराष्ट्र (चालक)

4. नीबाजी आनंदा पाटिल, उम्र 60 वर्षे, रा. पिलोदा, अंमळनेर

​​​5. कमला नीबाजी पाटिल, वय 55 वर्षे, रा. पिलोदा, अंमळनेर, जळगाव.

6. चंद्रकांत एकनाथ पाटील, वय 45 वर्षे, रा. अंमळनेर, जळगाव. () (उपरोक्त 1 ते 6 पर्यंतच्या मृतांची ओळख आधार कार्डद्वारे केलेली आहे),

7. श्रीमती अरवा मुर्तजा बोरा, वय 27 वर्षे, रा. मूर्तिजापुर, अकोला (महाराष्ट्रातील नातेवाईकांद्वारे ओळख),

8.सैफुद्दीन अब्बास, रा. नूरानी नगर, इंदूर. (नातेवाईकांद्वारे ओळख पटलेली आहे.)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आर्थिक मदत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांना म्हणाले की, बस अपघाताची घटना अतिशय दुर्दैवाची आहे. मी दोन वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा केली आहे. ते स्वत:देखील या घटनेविषयी गंभीर आहेत. एक मंत्रीदेखील त्यांनी तेथे नेमलेले आहेत. राज्य शासनाच्या वतीने मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर करत असून शासन मृतांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदनशील आहे.

उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

या दुर्घटनेवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवरून शोक व्यक्त केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, इंदोर-अमळनेर ही ST बस मध्यप्रदेशातील धार येथे पुलावरून नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचे मृत्यू झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहेत. काही लोकांना सुरक्षित वाचविण्यात यश आले आहे. बचाव कार्य आणि जखमींना उपचारासाठी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाचे अधिकारी मध्यप्रदेश प्रशासनाशी समन्वय ठेवून आहेत. मीसुद्धा धार जिल्हाधिकारी आणि ST प्रशासनाशी संपर्कात आहे. शोध आणि बचावकार्य वेगाने केले जात आहे. जखमींना लवकर आराम मिळो, अशी मी प्रार्थना करतो.
अपघाताची माहिती मिळताच खालघाटासह आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले. इंदूर आणि धार येथील एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले. हा पूल जुना असल्याचे सांगितले जाते. बस महाराष्ट्र राज्य परिवहनची आहे. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रशासनाला बचाव आणि मदत कार्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here