साईमत सोयगाव प्रतिनिधी
सोयगाव येथे संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात 76 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी माजी जि.प.अध्यक्ष, औरंगाबाद हरिश्चंद्र लघाने यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.यावेळी अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ बाबुरावजी काळे, व संस्थेचे सचिव प्रकाश बाबुरावजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. तसेच कै.बाबुरावजी काळे मराठी स्कूल च्या विद्यार्थिनींनी देशभक्ती गीत .विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. व इ.10वी उतीर्ण व निबंध स्पर्धेत सहभाग असलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारीतोषिक वितरण करण्यात आले.
या ध्वजारोहणासाठी सोयगाव नगरपंचायत चे नगराध्यक्षा श्रीमती आशा तडवी,संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे ,ज्ञानज्योती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश यादव, कै.बाबुरावजी काळे मराठी स्कूल चे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलीस,महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक,गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, पत्रकार, व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.