रोटरीच्या कायरोथेरेपी शिबिराचा ७५० रुग्णांना लाभ

0
17
रोटरीच्या कायरोथेरेपी शिबिराचा ७५० रुग्णांना लाभ-www.saimatlive.com

साईमत चोपडा प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्यातर्फे आयोजीत कायरोप्रॅक्टिस ट्रीटमेंट शिबीर शहरातील हरेश्र्वर कॉलनी येथील रोटरी भवन येथे संपन्न झाले. ७ दिवस चाललेल्या शिबिराचा तब्बल ७५० रुग्णांना लाभ झाला असून, अनेक रुग्णांना अनेक वर्षांच्या जुन्या दुखण्यापासून मुक्तता मिळाली आहे.

यावेळी शिबिरात कुठल्याही प्रकारची गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, खांदेदुखी, सायटिका, ऍसिडिटी, पोट साफ न होणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना सेवा देण्यात आली. कायरोप्रॅक्टिस थेरपीस्ट डॉ. संदीप नायक, डॉ. राजकुमार सिंगानिया आणि त्यांच्या टिमने सात दिवस सदर कॅम्प घेतला. शरीराच्या नर्वस सिस्टीम आणि हाडांमध्ये आलेल्या त्रासाला ठीक करणाऱ्या या उपचाराचा असंख्य रुग्णांनी लाभ घेतला. कुठल्याही प्रकारचे मेडिसिन अथवा औषध न देता दिल्या जाणाऱ्या थेरपीने जागेवर दुखणे थांबल्याने अनेकांनी रोटरीचे आभार मानले. या शिबिराचा समारोप सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे, माजी अध्यक्ष पंकज बोरोले, सचिव अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख लिना पाटील, एम. डब्लू. पाटील, नितीन अहिरराव, व्ही.एस.पाटील, रुपेश पाटील, ईश्वर सौंदांनकर, पवन गुजराती, संजय बारी, विपुल छाजेड, गौरव महाले, चंद्रशेखर कोष्टी, विलास कोष्टी, भालचंद्र पवार, विलास पी.पाटील, रमेश वाघजाळे, अरुण सपकाळे, प्रदीप पाटील, स्वप्नील महाजन व अविनाश पाटील यांच्या उपस्थितीत झाला.

सदर कार्यक्रमात काही गरीब व गरजु लोकांना कंबरेचे पट्टे मोफत देण्यात आले तर काही रुग्णांनी या शिबीरा माध्यमाने त्यांच्या व्याधिंपासून आराम मिळाल्यामुळे आपल्या मनोगतातून रोटरी चे आभार मानले. सदर शिबिरासाठी रोटरी क्लब चोपडाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. सूत्र संचालन संजय बारी तर आभार प्रदर्शन अर्पित अग्रवाल यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here