स्वातंत्र्य दिनी ७० रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने केले रक्तदान

0
37

चाळीसगावला रोटरी क्लब, शहर पोलीस स्टेशनतर्फे स्तुत्य उपक्रम

साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी:

रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव आणि चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनानिमित्त चाळीसगाव पोलीस स्टेशन आवारात झालेल्या भव्य रक्तदान शिबिरात ७० रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.
शिबिराला अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील उपस्थित होते. शिबिरासाठी जीवन सुरभी ब्लड बँक, दत्ता भदाणे, डॉ.आसिफ अली, प्रवीण पाटील आणि त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले. शिबिरात १५ पोलीस, २५ रोटरी सदस्य, गावातील इतर ३० नागरिक असे ७० रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरात रोटरीच्या महिला सदस्या पूजा मालपुरे, विजया बोरसे, मनीषा मालपुरे, दर्शना येवले, दीपाली सोनगिरे, नेहा शाह यांनीही स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.

कार्यक्रमाला समाजसेवक तथा उद्योजक वर्धमान धाडीवाल आणि गणेश गवळी यांनी भेट देऊन रक्तदान केले. यावेळी ‘रहा अपडेट न्यूज’चे अमन मुराद पटेल यांनीही रक्तदान केले. सोबत समीर शेख यांची उपस्थिती होती.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिल मालपुरे, सचिव निलेश शर्मा, प्रकल्प प्रमुख किरण देशमुख, संजय चौधरी, पियुष सोनगिरे, प्रवीण बागड, अक्षय बागड, विजय शाह, प्रीतेश कटारिया, निळकंठ पाटील, निलेश पिंगळे, विवेक येवले, सामाजिक कार्यकर्ते श्री.कासार यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here