गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारासह सन्मान
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टी जिल्हा महानगराच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या ६८ गणेश मंडळांना ‘गणराया पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. शहरातील टाॅवर चौकात भारतीय जनता पार्टीने अतिशय भव्य असे व्यासपीठ उभारले होते. याठिकाणी एलईडी स्क्रीनद्वारे रोषणाई केली होती. तसेच राष्ट्र महापुरुषांच्या प्रतिमांसह त्यांचे संदेश एलईडी स्क्रीनद्वारे दिसत होते. सोहळ्याला मंत्री ना.गिरीष महाजन, आ.मंगेश चव्हाण उपस्थित होते.
याप्रसंगी ट्रॉफीसह प्रभू श्रीरामाचा गमछा देऊन कार्यकर्त्यांचा मंत्री ना.गिरीष महाजन, आ.सुरेश भोळे राजू मामा, आ.मंगेश चव्हाण, जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, पूर्व जिल्हाध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, भाजप प्रदेश सदस्य भगतभाई बालाणी, संतोष इंगळे तसेच भाजपचे जिल्हा महानगराचे पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, माजी नगरसेवक, विविध आघाडीचे अध्यक्ष यांच्या हस्ते गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कारासह सन्मान करण्यात आला. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या समवेत ना.गिरीष महाजन, आ.सुरेश भोळे, दीपक सूर्यवंशी यांनी लेझीम ढोल पथकावर सुंदर असा ठेका धरुन कार्यकर्त्यांच्या आनंदात सहभागी झाले होते. याप्रसंगी अनेक चिमुकल्यांनी भाजपाच्या मंचावर येऊन आपली कला याठिकाणी सादर केली. अशा चिमुकल्या कलाकारांचे आ.सुरेश भोळे यांनी स्वागत केले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी भाजपाचे सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, भारती सोनवणे, मंडल अध्यक्ष आनंद सपकाळे, विनोद मराठे, अजित राणे, दीपमाला काळे, अतुल बारी, अक्षय चौधरी, प्रकाश पंडित यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मनोज भांडारकर, अनिल जोशी, विनोद मराठे यांनी केले.